बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तारीख पे तारीख! टीईटीची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; विद्यार्थी संभ्रमात

मुंबई | राज्यातील शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेची तारीख पुढं ढकलण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार होती, पण त्यादिवशी देगलूर आणि बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे टीईटीची परीक्षा पुढं ढकलली आहे.

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी ही आता 21 नोव्हेंबर 2021 ला होणार आहे. याविषयीचं सुधारित वेळापत्रक हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं जारी केलं आहे. टीईटीची परीक्षा ही याआधी 10 ऑक्टोबरला होणार होती, पण त्यादिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होती, त्यामुळं ही परीक्षा 31 ऑक्टोबर घेण्याचं ठरवण्यात आलं होतं.

31 ऑक्टोबरला राज्य आरोग्य विभागाची परीक्षा होणार असल्यानं टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबरला होणार होती. त्यातच आता ही परीक्षा तिसऱ्यांदा पुढं ढकलली आहे. त्यामुळं आता सतत बदलल्या तारखांमुळं विद्यार्थी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या परीक्षेसाठी साधारणत: 3 लाख 30 हजार 642 उमेदवार बसले आहेत. तसेच या परीक्षेसाठी 5 हजार परीक्षा केंद्रांची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळं आता या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे.

पाहा पत्रक-

थोडक्यात बातम्या –

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

पुण्यातील बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ

‘फडणवीसांची जिरवायची होती’?; वडेट्टीवारांच्या दाव्यावर नितीन गडकरींचं प्रत्युत्तर

‘शेतकऱ्यांची अडवणूक केली तर याद राखा…’; अजित पवारांचा थेट इशारा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More