बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुहूर्त ठरला! 10वी आणि 12वी परीक्षेच्या तारखा जाहीर, यंदा ऑफलाईन परीक्षा

मुंबई | कोरोनाच्या काळात सर्वांना घरी रहावं लागलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर आता राज्यातील काही भागात शाळा आणि महाविद्यालये काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत. अशातच आता राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

पुढील वर्षी बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च रोजी होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा येत्या 15 मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यावर्षी परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याने आता विद्यार्थी देखील अभ्यासाला लागल्याचं दिसतंय.

कोरोना काळात दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता राज्यात ओमिक्राॅनचा धोका वाढतोय. दहावी आणि बारावीचं वर्ष महत्त्वाचं असल्यानं आता आम्ही ओमिक्राॅनबाबत माॅनिटरिंग करत आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, परीक्षा जवळ आल्याने आता विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग तयारीला लागल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर सरकार देखील पुर्ण खबरदारी घेण्याच्या प्रयत्नात आहे.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

ओमिक्राॅनबाबत तज्ज्ञांचा गंभीर इशारा; ‘या’ महिन्यात रूग्ण झपाट्याने वाढणार

ठोंबरेंच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार म्हणतात, ‘रुपालीताई डॅशिंग नेत्या, मात्र…’

विरूष्काला मोठा धक्का! विराट कोहलीपाठोपाठ आता अनुष्कालाही डच्चू

करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचे मंत्री?; अशिष शेलार म्हणतात, ‘CCTV फुटेज तपासा’

गुगलचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More