Datta Gade | स्वारगेट (Swargate) बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला पोलिसांनी ७० तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर शिरूर (Shirur) येथे उसाच्या शेतातून अटक केली. मात्र, तपासादरम्यान त्याच्या गुन्हेगारी कृत्यांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक महिलांना फसवून आणि त्यांच्यावर दबाव टाकून त्याने अत्याचार केल्याचा खुलासा झाला आहे.
शिरूर परिसरातील एका लॉजबाहेर बसून तो सतत येणाऱ्या महिलांवर पाळत ठेवत असे. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तो छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ तयार करत असे. हे व्हिडिओ त्यांच्याविरोधात वापरत, महिलांना ब्लॅकमेल करत आणि त्यांच्या कमजोर जागांचा फायदा घेत त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करत असे.
ब्लॅकमेलिंगद्वारे महिलांना धमकावण्याचा प्रकार-
दत्ता गाडे विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांना टार्गेट करत असे. त्यांची पूर्ण माहिती मिळवल्यानंतर तो त्यांच्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ काढायचा आणि नंतर ते लीक करण्याची धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्याच्या दबावामुळे अनेक पीडित महिला पोलिसांकडे तक्रार देण्यास घाबरत होत्या.
स्वारगेट अत्याचार पीडितेच्या जबाबानुसार, गाडेने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यासमोर हार मानली होती. पोलिसांनी आता आरोपीविरुद्ध अधिक पुरावे गोळा करण्यासाठी तपासाची गती वाढवली आहे.
बदनामीची भीती-
दत्ता गाडेच्या अशा गुन्हेगारी वागणुकीमुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण यायचा. बदनामीची भीती असल्याने कोणीही त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नव्हते. याचाच फायदा घेत गाडे अधिक हिंस्र होत गेला आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना वारंवार अंजाम देत राहिला.
स्वारगेट अत्याचार पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात गाडेने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी तिने त्याला विरोध केला नाही, असे तिने स्पष्ट केले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे आणि त्याच्या इतर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.