Datta Gade | स्वारगेट (Swargate) अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आढळल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्याआधीच त्याने गळफास लावण्याचा प्रयत्न केला होता का, याबाबत चौकशी सुरू आहे.
आरोपीच्या गळ्यावर संशयास्पद व्रण-
पोलिसांनी अटक केल्यानंतर गाडेचे प्राथमिक वैद्यकीय परिक्षण करण्यात आले. या तपासणीदरम्यान त्याच्या मानेवर दोरखंडाचे व्रण असल्याचे आढळले. या संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी माहिती देताना सांगितले की, ‘त्याच्या गळ्यावर काही व्रण आढळले आहेत. काही लोकांचा दावा आहे की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र, दोरी तुटल्याने आणि लोक वेळेत पोहोचल्याने तो वाचला.’
पोलिस तपासानंतर सत्य स्पष्ट होणार-
या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिस घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या व्रणांचे कारण आत्महत्येचा प्रयत्न आहे की इतर काही कारण, हे अधिक तपासानंतर स्पष्ट होईल. सध्या वैद्यकीय अहवालात त्याच्या गळ्यावर व्रण असल्याचे नमूद करण्यात आले आहे, असेही अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गुनाट गावातील शेतातून आरोपीला पकडले-
घटनेनंतर आरोपी गुनाट गावातील शेतात लपून बसला होता. पोलिसांनी ड्रोन्स, श्वानपथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. अखेर मध्यरात्री 1.10 वाजता पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिस कोठडीत नेल्यानंतर गाडेने (Dattatray Gade News) भावनिक होऊन ‘माझं चुकलं, मला माफ करा’ असं म्हणत कबुली दिली. मात्र, त्याने एका मोठ्या दाव्याने खळबळ उडवली ‘मी अत्याचार केले नाहीत, हे संबंध परस्पर सहमतीने झाले,’ असा दावा त्याने पोलिसांसमोर केला आहे.