दत्त जयंती 14 की 15 डिसेंबरला; जाणून घ्या नेमकी कधी?

Datta Jayanti 2024

Datta Jayanti 2024 l भगवान दत्तात्रेयांचे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांचे अंश मानले जातात. भगवान दत्तात्रेयांची जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय अवतरले होते. दत्तात्रेय हे भगवंतासह गुरूचे रूप मानले जाते. म्हणून भगवान दत्तात्रेयांना श्री गुरुदेवदत्त असेही म्हणतात.

दत्त जयंती 2024 कधी आहे? :

पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी आगाहान महिन्याची पौर्णिमा शनिवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी 04:58 पासून सुरू होणार आहे आणि रविवार, 15 डिसेंबर रोजी दुपारी 02:31 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे संध्याकाळी भगवान दत्तात्रेयांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी 14 डिसेंबर म्हणजेच शनिवारी दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.

Datta Jayanti 2024 l दत्त जयंतीचे महत्त्व :

भगवान दत्तात्रेय महर्षी अत्री आणि माता अनुसूया यांचे पुत्र म्हणून अवतरले होते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार माता अनुसूया यांनी कठोर साधना केली होती. याचा परिणाम म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव दत्तात्रेयांच्या रूपात अवतरले. दत्तात्रेय जयंतीला जो गंगा स्नान करतो, दान करतो, पूजा करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. तसेच देव त्याला आशीर्वाद देतो. तसेच जो कोणी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो त्याला मोक्ष प्राप्त होतो.

याशिवाय गुजरात, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भगवान दत्तात्रेयांची प्रमुख मंदिरे आहेत. भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त या सर्व राज्यातील मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना केली जाते. तसेच भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तिन चेहरे आणि सहा हात आहेत. सर्वात विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरू होते, त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्व आहे.

News Title – Datta Jayanti 2024

महत्त्वाच्या बातम्या-

काळजी घ्या! राज्यात ‘या’ तारखेपासून गारठा वाढणार?

गेल्यावर्षी 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळणारं सोनं आज पोहोचलं ‘इतक्या’ हजारांवर!

भाजप अजितदादा-एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का?, आतली बातमी समोर

आज भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

पवारसाहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .