महाराष्ट्र सोलापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचं निधन

इंदापूर | राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वत: भरणे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ते 90 वर्षांचे होते.

विठोबा भरणे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. इंदापूर तालुक्यात तात्या नावाने ते ओळखले जायचे.

विठोबा भरणे यांच्यावर आज बुधवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इंदापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजेच भरणेवाडी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंत्यविधीला उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील आमदार सोलापूर जिल्ह्यातील आमदार, बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?

ब्रिटनमधील ‘स्ट्रेन’चा एकही रुग्ण राज्यात नाही- राजेश टोपे

“डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य”

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?- चित्रा वाघ

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, इतके नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या