उस्मानाबाद महाराष्ट्र

“फक्त नवरदेवाने लग्नाची घाई करुन होत नाही, घरच्यांनीही मनावर घेतलं पाहिजे”

उस्मानाबाद | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

एखाद्या नवरदेवाने स्वत: लग्न करा असे म्हणण्यापेक्षा त्याच्या घरच्यांची ती गोष्ट मनावर घेतली पाहिजे. मात्र, भाजपला लग्नाची खूप घाई झाली होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भाजपला लगावला आहे.

विधानपरिषदेच्या चार जागांवरील यश हे कोणत्याही एका पक्षाचं नसून महाविकास आघाडीचं एकत्रित यश असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. दत्तात्रय भरणे यांनी महाविकासआघाडीला मतदान करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदवीधर निवडणुका मनावर घेतल्या. विनंती केल्यावर काय चमत्कार होऊ शकतो, हे या निवडणुकीत समोर आलं आहे. निवडणुकीचा निकाल पाहता महाविकासआघाडी जिंकली असून भाजप हरल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, असंही दत्तात्रय भरणे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

शेतकरी आंदोलनामुळे भाजपला मोठा झटका, ‘या’ राज्यातील सत्ता जाणार?

“जिल्हा परिषदेच्या शाळांना नावं ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच योग्य उत्तर”

“जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल, दुप्पट जनता तुम्हाला देईल”

राज ठाकरेंनाही डिसले गुरुजींचा अभिमान, अशा शब्दात केलं कौतुक!

भारताला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या