बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अकोला | राज्यात दरदोज वेगवेगळे गुन्हे घडत असतात. पैशांमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं पहायला मिळतं. अशीच एक धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. अकोल्यात सख्ख्या मुलीने आपल्या आईची हत्या केल्याची घटना घडली आहे.

सरुबाई काशीनाथ कांडेलकर यांचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अकोल्यातील गौरक्षण रोड परिसरात काल ही घटना घडली. पोलिसांनी सरुबाई यांची मुलगी कविता दिनकर बायस्कर हिला ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी केली. या प्रकरणी अधिक चौकशी करून पोलिसांनी आरोपी मुलगी कविता दिनकर बायस्कर हिला ताब्यात घेतलं.

मायलेकीमध्ये आर्थिक देवाणघेवाणी वरुन वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. आईने मुलीला एक लाख मागितले त्यानंतर हा वाद शिगेला पोहचला आणि मुलींनी तिच्या सख्या आईला दगडावर आपटून मारल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मुलीने आपल्या आईच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, तीन मुलीच असल्याने आईने तिघींच्याही नावाने शेती आणि इतर प्रॉपर्टी करून दिली होती. कविताला सात गुंठे जमीन अधिक देण्यात आली होती. ते गुंठे कविताने विकल्यानंतर आईने तिला त्यातील एक लाख रुपये मागितले. यानंतर कविता आणि आईमध्ये वाद झाला. त्यानंतर कविताने आईला दगडावर आपटून तिचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

नवऱ्याकडून अमानुष मारहाण; मदत मागण्यासाठी गेलेल्या गर्भवती पीडितेला पोलिसांनी हाकललं!

अभिमानास्पद! सहाच्या सहा बहिणी पोलिस दलात; अनिल देशमुखांनीही केलं कौतुक

वाढदिवसाला मैद्याच्या केकऐवजी फळांचा केक कापा; सोशल मीडियावर मागणीनं धरला जोर

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

चिंताजनक! ‘कोरोना’ लसीचे डोस घेऊनही जिल्हाधिकारी आढळले ‘कोरोना पॉझिटिव्ह’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More