औरंगाबाद महाराष्ट्र

‘या’ गावात सुनेने सासूचा तर जावयाने सासऱ्याचा केला पराभव!

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील धोंधलगावात एक लक्षवेधी लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत सुनेने आपल्या सासूचा तर जावयाने आपल्या सासऱ्याचा पराभव केला आहे.

धोंधलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवशाही पॅनलकडून सासू गोकर्णा आवारे आणि तर छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून सून कल्याणी आवारे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

शिवशाही पॅनलकडून जावई लक्ष्मण काळे हे तर त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य हे छत्रपती ग्रामविकास पॅनलकडून एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते.

आज लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानुसार सून कल्याणी आवारे यांनी आपल्या सासू गोकर्णा आवारे यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे जावई लक्ष्मण काळे यांनी त्यांचे सासरे रावसाहेब वैद्य यांचा पराभव केला आहे.

थोडक्यात बातम्या-

वादात सापडलेल्या ‘तांडव’ वेबसीरिजच्या दिग्दर्शकाने मागितली माफी!

“मी येत्या दोन दिवसांत मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद घेणार”

21 वर्षाचा पोरगा सगळ्यांना पुरुन उरला; सर्वात तरुण सरपंच होणार?

भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं- चंद्रकांत पाटील

“भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या