महाराष्ट्र मुंबई

सासू सतत टोमणे मारायची; संतापलेल्या सूनेनं उचललं काळजाचा थरकाप उडवणारं पाऊल!

मुंबई | ‘घरोघरी मातीच्या चुली’, ही म्हण तुम्हाला माहित असेलच, सर्वांच्या घरात कौटुंबिक वाद होतात. त्यातल्या त्यात सासु-सुनेचे भांडण तर घरोघरी पहायला मिळते. पण मुंबईतील चेंबूरमध्ये सासु- सुनेच्या भांडणाचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

चेंबूरमध्ये टिळकनगरमध्ये राहणाऱ्या एका सूनेने आपल्या सासूच्या डोक्यात बॅट मारून तिची हत्या केली आहे. घडलेल्या प्रकाराने संपुर्ण परिसर हादरून गेला आहे. टिळक नगरपरिसरात पेस्टम सागर कॉलनीत एस. आर. ए. इमारतीत सज्जा पाटील म्हणजे सासू ह्या आपला दत्तक मुलगा निलेश पाटील आणि सून संजना पाटीलसह राहत होत्या. निलेश हा कुठेही नोकरीला नव्हता तो रोजच्या दैनंदिन रोजगारावर जायचा आणि सज्जा पाटील ह्या एका मंदिराजवळ भीक मागायच्या. त्यांना मिळेल त्या पैशातून घर चालायचं.

सज्जा पाटील नेहमी आपल्या सुनेला यावरून हिणवायच्या. त्यामुळे सूनेला राग अनावर झाला आणि तिने सासूच्या डोक्यात बॅट घातली आणि त्यांची हत्या केली. सून संजनाने केलेली हत्या लपवण्यासाठी सासू बाथरूममध्ये घसरून पडली असल्याचं सांगितलं. पण टिळकनगर पोलिसांनी सज्जा बाई यांचा मृतदेह शवविच्छदनासाठी नेला असता तेव्हा त्यावेळी डॉक्टरांनी ही हत्या असल्याचं सांगितलं.

पोलिसांनी त्यानंतर तपास करताना आधी मुलगा निलेशची चौकशी केली मात्र त्यांना काही हाती लागलं नाही. मात्र सुूनेची चौकशी करताना काही धागेदोरे हाती लागले तेव्हा खाकीचा हिसका दाखवल्यावर सूनेने आपला गुन्हा मान्य केला.

महत्वाच्या बातम्या-

पालकांनी परीक्षेबाबत चिंता करु नये, लवकरच निर्णय घेऊ- उदय सामंत

अल्पवयीन गर्भवती मुलीचा बापानेच केला घात; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“…मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नष्ट होण्यासाठी विठ्ठलाला साकडं का घातलं?”

कोरोनामुक्तीचा शेवाळवाडी पॅटर्न… 10 दिवसांत गाव कोरोनामुक्त

…..म्हणून कोरोनायोद्धे असलेल्या डॉक्टरांनी दिलाय आंदोलनाचा इशारा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या