सोलापूर | प्रेमविवाहाला (love marriage) विरोध केल्याने एका मुलीने आपल्या वडिलांसोबत अत्यंत धक्कादायक कृत्य केलंय. या मुलीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन आपल्या वडिलांना मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री माढा येथे घडली. महेंद्र शहा असं मारहाण झालेल्या पित्याचं नाव आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या मुलीच्या पित्याचं नाव आहे. मारहाणीनंतर शहा हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. (Father brutally beaten by daughter)
साक्षी महेंद्र शहा ही पुण्याला दुकानाचे साहित्य आणायला गेली होती. सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास बसने शेटफळ येथे आली. तेथून आणण्यासाठी वडील कार घेऊन गेले होते. रस्त्यात वडाची वाडीजवळ लघुशंकेचे निमित्त करून तिने गाडी थांबवण्यास सांगितले. मागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांच्या पायावर मारायला सुरुवात केली. डोक्यात खोऱ्याचा दांडा मारला. ते रक्तबंबाळ झाले. तेव्हा मारेकरी पसार झाले.
वडिलांना मारण्यासाठी पोटच्या मुलीने चौघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांची सुपारी दिली होती. वडिलांना मारण्यासाठी साक्षीने चौघा आरोपींना प्रत्येकी 15 हजार दिले होते.
चैतन्य याने गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी व जेवण्यासाठी मारेकऱ्यांना पैसे दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- राजस्थानमध्ये 19 नवे जिल्हे, महाराष्ट्रातही 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव?
- मुलगा बोलला की वाजायची शिट्टी.. डॉक्टरांकडे नेताच झाला अजब खुलासा
- बायको नवऱ्याला उठता बसता म्हणायची काळा!, नंतर त्याच्यावरच ठोकली केस… कोर्टाचा मोठा निकाल
- आजारी पत्नीला विचारली शेवटची इच्छा, प्रियकरासोबत सेX… पत्नीच्या उत्तरानं पती हैराण
- जाणून घ्या पुणे मेट्रोच्या तिकीटाचे दर