मनोरंजन

धोनीच्या लेकीचा गिटार वाजवत गातानाचा व्हिडीओ व्हायरल! पाहा व्हिडीओ

मुंबई |  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा हिचे फोटो आणि व्हिडिओ अधुनमधून व्हायरल होताना दिसतात. सध्या वायरल होत असलेल्या व्हिडीओत 4 वर्षांची झिवा गिटार वाजवून खूप निरागसपणे गाणं म्हणत आहे. या व्हिडीओत झिवा ‘लँड ऑफ हारमनी’ हे इंग्लिश गाणं म्हणत आहे. धोनीने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला.

व्हिडीओमध्ये झिवा अगदी लहान वयातही आपल्या गोड आवाजात गाणं म्हणता म्हणता गिटारही वाजवत आहे. अगदी गाण्याच्या तालानुसार ती गिटारवर हात फिरवत आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ 22 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

धोनी सध्या मैदानातून दूर असून आपल्या कुटुंबासोबत मसूरी येथे सुट्टीसाठी गेला आहे. महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर जास्त अ‌ॅक्टिव्ह नसतो. मात्र त्याला जेव्हा रिकामा वेळ भेटतो तेव्हा तो झिवासोबतचा  फोटो किंवा व्हिडीओ आठवणीने आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतो.

बर्फ झिवातील शानदार ट‌ॅलेंटला बाहेर आणत आहे, असं धोनीने या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. यापूर्वीही धोनीची पत्नी साक्षीने देखील धोनी आणि झिवाचा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला होता. व्हिडीओत दोघेही बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

Snow brings the best out of her @ziva_singh_dhoni

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

ट्रेंडिंग बातम्या-

…नाहीतर बाटली विकत असता; रूपाली ठोंबरेंचं गुलाबराव पाटलांवर टीकास्त्र

“अन् सत्तेची पोळी शेकायची, इतकं निर्घृण राजकारण कधी कोणी केलं नव्हतं”

फाइलवर शेरा मराठीतच लिहा; उद्धव ठाकरेंचे आदेश

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या