भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ; ‘या’ माजी खेळाडूने संपवलं जीवन

David Johnson | भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी खेळत आहे. पण या सगळ्यामध्ये भारतीय क्रिकेटशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या माजी खेळाडूने घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डेव्हिड जॉन्सन या माजी भारतीय खेळाडूने वयाच्या 52 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डेव्हिड जॉन्सनने भारतीय संघासाठी कसोटी फॉरमॅट आणि कर्नाटकसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलं होतं.

David Johnson यांनी जीवन संपवलं

भारत आणि कर्नाटकचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचे बेंगळुरू येथे निधन झालं. बेंगळुरूमधील चौथ्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून जॉन्सनचा (David Johnson) मृत्यू झाला. जॉन्सन हे आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते आणि तीन दिवसांपूर्वीच त्यांना स्थानिक रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

डेव्हिड जॉन्सनने भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. त्याने 1996 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं. यानंतर त्याला संधी मिळाली नाही. या काळात त्याने एकूण 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

भारतासाठी दोन कसोटी सामने खेळण्याव्यतिरिक्त डेव्हिड जॉन्सनने कर्नाटकसाठी दीर्घकाळ रणजी क्रिकेट खेळले आहे. त्याने कर्नाटकसाठी 39 प्रथम श्रेणी सामने आणि 33 लिस्ट ए सामने खेळले. 1992 मध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2002 पर्यंत तो सक्रिय राहिला.

David Johnson | भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा

डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळेने पोस्ट करत म्हटलंय की माझा क्रिकेट पार्टनर डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. त्यांच्या कुटुंबीयांप्रती हार्दिक संवेदना.

महत्त्वाच्या बातम्या- 

“40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचं कमोड..”; आलिशान पॅलेसमुळे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अडचणीत

सुजय विखेंना पराभव पचेना; घेतला मोठा निर्णय, निलेश लंकेंविरोधात…

‘आम्हाला भिडवत ठेवलं तर… ‘; मनोज जरांगेंचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा

बहुचर्चित ‘मुंज्या’चा थरार आता ओटीटीवर दिसणार; कधी आणि कुठे पाहणार?

“हिंमत असेल तर…”, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलं चॅलेंज