बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भर सामन्यात डेव्हिड वॅार्नर ढसाढसा रडला, फॅन्सही हळहळले!

नवी दिल्ली |  सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यांचा सर्वात आघाडीचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर याला बाहेर बसवलं होतं. वॉर्नरनं 2014 साली हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पहिल्यांदाच त्याच्यावर टीमच्या बाहेर बसण्याची वेळ आली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॅट्समनपैकी एक असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या हकालपट्टीनं अनेक क्रिकेटचे चाहते नाराज झाले आहेत. त्यातच राजस्थान विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान वॉर्नरचा व्हायरल झालेला एक फोटो पाहून क्रिकेट फॅन्स हळहळले आहेत.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅच दरम्यान डेव्हिड वॉर्नर टीमच्या डगआऊटमध्ये बसला होता. त्या दरम्यानचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये वॉर्नर नाराज होऊन मान खाली घालून बसलेला असल्याचं दिसत आहे. हैदराबाद टीमचा सहकारी त्याची समजूत घालत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वॉर्नरला टीमच्या बाहेर बसवणाऱ्या हैदराबादच्या निर्णयावर क्रिकेट फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

हैदराबादच्या टीमनं त्यांच्या निराशाजनक कामगिरीचं खापर डेव्हिड वॉर्नरवर फोडलं. त्याच्या ऐवजी केन विल्यमसनकडे नेतृत्व दिलं, पण कर्णधार बदलल्यानंतरही हैदराबादसमोरच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा 55 धावांनी पराभव झाला आहे. राजस्थाननं दिलेलं 221 धावांचं आव्हान पार करण्यासाठी  हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 165 रन करता आले. हैदराबादच्या एकाही बॅट्समनला अर्धशतक करता आलं नाही. मनिष पांडेने सर्वाधिक 31 रन केले.

दरम्यान, या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानची टीम पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे, तर हैदराबाद शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने 7 पैकी 3 सामने जिंकले असून 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला, तर हैदराबादला 7 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली आहे.

थोडक्यात बातम्या

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

“तुमच्या ‘तिसरी लाट’ या चित्रपटामध्ये मला मृतदेह मोजण्यासाठी स्पाॅट बाॅयचं काम द्या”

भारतात कोरोनामुळे जळणाऱ्या सरणावरून खिल्ली उडवणं ‘या’ पक्षाला पडलं महागात

मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे; भाजपला तर 50 जागाही मिळाल्या नसत्या, जर…

पुढच्या 2 दिवसात राज्यभरात गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More