बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दाऊद तर पाकिस्तानात आहे, मग तो इकडे कसा येऊ शकतो”

मुंबई | 2 ऑक्टोबर रोजी एका क्रुझवर कारवाई करत एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा केला होता. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवरून राज्यासह देशात सध्या भरपूर उलटसुलट चर्चा चालू आहेत. बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानवरील कारवाईनंतर या प्रकरणाला आता धार्मिक रंग आला आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकरणात उडी टाकली आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर एका दलिताचा नोकरीचा हक्क हिरावून घेतल्याचा आरोप केला होता. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. यातच आता रामदास आठवले यांनी समीर वानखेडे यांच्या बाजून आपण उभं असल्याचं म्हटलं आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे का?, यावर प्रश्न विचारला असता. दाऊत तर पाकिस्तानात आहे मग इकडं कसा येऊ शकतो, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

समीर वानखेडे हे दलित कुटुंबातील आहेत. त्यांना मुद्दाम लक्ष्य करण्यात येत आहे. ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत याचाच एक भाग म्हणजे त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश मिळवलं आहे, असंही आठवले म्हणाले आहेत. नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्या पाठीमागे लागले आहेत आता आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीमागे लागणार आहोत, असंही नवाब मलिक यांना उद्देशून आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, एका क्रुझ पार्टीवरून सुरू झालेलं हे प्रकरण आता नव्या वळणावर आलं आहे. सुरूवातीला फक्त ड्रग्जपुरतंच मर्यादित असणारं प्रकरण आता धार्मिक, राजकीय आणि केंद्र विरूद्ध राज्य संघर्षाचं झालं आहे. आर्यन खान प्रकरणाच्या नव्या चौकशीसाठी राज्य सरकारनं नुकतीच एक समिती नेमली आहे. परिणामी आता एकाच प्रकरणाचा राज्य आणि केंद्र दोन्ही या दोन्ही मार्फत तपास होणार आहे.

थोडक्यात बातम्या 

दिवाळीआधी सोनं पुन्हा महागलं! वाचा आजचा सोने-चांदीचा भाव

कॅरेबियन संघासाठी तारणहार धावला! ‘या’ दिग्गज अष्टपैलू खेळाडूची संघात एन्ट्री

गुंतवणूकदारांना मोठा फटका! सेनसेक्समध्ये सहा महिन्यातील सर्वात मोठी घसरण

‘जर गाडीत चहाचा थेंब जरी सांडला तर मी…’; गडकरींची कंत्राटदारांना तंबी

डाॅ. शरद पवार! शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ पदवी बहाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More