देश

कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले…’देश आत्मनिर्भर होतोय’

नवी दिल्ली | ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे या दोन्ही लशी भारतातच तयार झाल्या आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचे अभिनंदन केलं आहे.

मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं.

मोदींनीही आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांनी देशवासीयांचं स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलंय.

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यात धक्कादायक घटना!; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार

शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधानांना अपमान वाटतो- हसन मुश्रीफ

कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन- ओमर अब्दुल्ला

कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप; सरकारकडून नवी नियमावली जाहीर

कोवॅक्सिन, कोव्हिशिल्ड आणि झायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापराला अखेर परवानगी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या