मुंबई | जनतेच्या सोयीसाठी राज्यातल्या हॉटेलांना त्यांचे किचन सुरू ठेऊन खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व पोहोचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता ठेवा. अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातल्या मासळीच्या विक्रीवर कोणतेही बंधन नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्रीकर आणि खरेदीदार असे दोघांनीही ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशा सुचना अजित पवार यांनी केल्या आहेत.
नागरिकांना जीवनावश्यक पदार्थ खरेदी करता येतील. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र, ऊसतोड मजुरांच्या जेवणाची काळजी संबंधित कारखान्यांच्या व्यवस्थापनांना घ्यावी लागणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय!
पंतप्रधानांकडे आवश्यक त्या मदतीची मागणी करणार- राजेश टोपे
महत्वाच्या बातम्या-
तुम्ही योद्धा आहात… लवकरच यातून बाहेर पडाल; ब्रिटनच्या पंतप्रधानांना मोदींचा धीर
पिंपरी चिंचवडमधले 3 कोरोनाबाधित रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी!
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण
Comments are closed.