मोठी बातमी! अजित पवारांच्या जीवाला धोका? कार्यकर्ते टेन्शनमध्ये

Ajit Pawar l राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. अशातच आता त्यांना सुरक्षेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका :

महाराष्ट्र पोलिसांना एक मोठी माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. गृह विभागाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांच्या ताफ्यावर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलीस आणि अजित समर्थकांमध्ये घबराट पसरली आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यावर मोठा हल्ला होऊ शकतो. हा हल्ला कट्टरवादी संघटनांकडून केला जाऊ शकतो, यासाठी लोकांना राजकीय गोष्टींमुळे भडकावण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्याच्या धमकीनंतर महाराष्ट्र पोलिसांनी सर्व संभाव्य सुरक्षा व्यवस्था केल्या आहेत. अशातच आता त्यांच्या जनसन्मान यात्रेच्या दौऱ्यावर आणि ताफ्यांवर नजर ठेवली जात असून त्यांची सुरक्षा वाढविण्यावर विचार केला जात आहे.

Ajit Pawar l पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर :

उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील मालेगाव मध्यवर्ती दौऱ्यावर जाणार आहेत. गुप्तचर विभागाने या प्रवासात पोलीस प्रशासनाला सावध राहण्यास सांगितले आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे अनेक नेते आणि संघटना अजित पवारांच्या विरोधात आहेत. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या खराब कामगिरीचा ठपकाही अजित गटावर टाकला जात आहे. त्यामुळे संघाचे लोकही अजित पवारांवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात अजित पवारांना काळजी घेण्याच्या सूचना आल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे दौरा आम्ही करणारच. तसेच पोलिसांचे काम आहे सुरक्षा देणे त्यामुळे तिथे काही चुकीचं घडू नये याकडे लक्ष देणे, ते याची काळजी घेतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

News Title : DCM Ajit Pawar Security Rise

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा

या राशीवर महादेवाची कृपा राहणार!

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर!

मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी शरद पवारांना घेरलं

सिद्धार्थ मल्होत्राचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सर्वांसमोर केलं असं काही की…