त्याच्या एका निर्णयानं संपूर्ण कुटुंब उध्वस्त केलं!

पुणे | काही दिवसांपूर्वी भीमा नदीपात्रात चार मृतदेह सापडले होते. 18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान हे चार मृतदेह सापडत गेले. त्यामुळं हा घातपात आहे की आत्महत्या अशी चर्चा सुरु होती. त्याचबाबतीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

नदीपात्रात सापडलेले मृतदेह हे एकाच कुटुंबातील आहेत. हे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील आहे. या कुटुंबीयांचा घातपात झाला नसून त्यांनी आत्महत्या केली आहे. एकाच कु़टुंबातील 7 व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण समजताच शहरात खळबळ उडाली आहे.

मयत पावलेले सगळे पवार आणि फुलवरे कुटुंबीय आहे. मयताच्या मुलाने एका मुलीला पळवून नेलं होतं. त्या मुलीला त्यांच्या मुलाने परत आणलं नाही. त्यामुळेच मुलाच्या वडिलांसह इतर सहा जणांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. यामध्ये त्या मुलाचे आई, वडिल, बहिण, बहिणीचा नवरा आणि बहिणीची तीन मुलं यांनी आत्महत्या केली आहे.

17 जानेवीरीच्या रात्री त्यांनी आत्महत्या केली आहे. त्या रात्री त्यांनी आपल्या मुलाला शेवटचा इशारा दिला होता. मुलगा फोन उचलत नसल्यानं त्याच्या मित्राच्या फोनवरुन बोलणं केलं होत. तू जर त्या मुलीला परत आणलं नाहीस तर आम्ही विष घेऊ किंवा पाण्यात जीव देवू, असा इशारा त्यांनी दिला होता. या संपूर्ण घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More