बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युक्रेनमधून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर; विकृत अवस्थेत सापडले ‘इतके’ मृतदेह

कीव | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. रशियाने दिवसेंदिवस युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रशियाकडून (Russia) होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनमधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती भयावह असताना युक्रेनमधील बुचा शहरातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुचा शहरातील सामुहिक कबरिस्तानात जवळपास 300 सामान्य युक्रेनियन नागरिकांचे मृतदेह आढळले आहेत.

रशियन सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात बुचा शहरातील शेकडो नागरिकांनी त्यांच्या जीव गमावला. बुचा येथील सामुहिक कबरिस्तानात 280 सामान्य नागरिकांचे मृतदेह आढळले आहेत. तर अनेक लोकांचे मृतदेह बुचा शहरातील रस्त्यावर विकृत अवस्थेत आढळून आले आहे. युक्रेनमधील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, युक्रेनमधील उद्ध्वस्थ झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. अनेक शहरात राज्य आपत्कालीन सेवेकडून बचावकार्य सुरू आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळत असल्याने निराशा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं; वाचा ताजे दर

“…म्हणून मी राज ठाकरेंना अधिक गांभीर्याने घेत नाही”

UPA अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“शरद पवारांवर टीका केल्याशिवाय यांना हेडलाईन मिळत नाही”

“भाजपला आता आणखी एक मनोरंजन करणारा मित्रपक्ष मिळाला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More