बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मृत स्वप्नील लोणकर मुलाखतीसाठी पात्र! वडिलांचा MPSC वर आरोप, म्हणाले…

मुंबई | पुण्यातील स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar) या तरुणाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 3 जुलै रोजी स्वप्नील लोणकरने एमपीएससी (MPSC) परीक्षेत 2 वेळा उत्तीर्ण झालेला असतानाही नोकरी मिळाली नसल्याने नैराश्यात जाऊन त्याने हा निर्णय घेतला होता. अशातच आता स्वप्नील लोणकर पुन्हा चर्चेत आला आहे.

आता या घटनेला 6 महिने पुर्ण झाली आहेत. अशातच आता MPSCचा भोंगळ कारभार समोर आला आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नील लोणकरचं नाव आलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्याचबरोबर स्वप्नीलच्या वडिलांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे.

माझ्याकडे एमपीएससी आयोगाचं पत्र आलेलं आहे. महाराष्ट्र सरकारला याबाबत माहिती असताना मुलाखतीची तारीख पाठवण्यात आली. म्हणजेच एमपीएससी लोणकर कुटुंबांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम करतंय, असंही स्वप्निल लोणकरचे वडील म्हणाले आहेत. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, स्वप्निलचं यादीत नाव आलंय म्हणजे तो कच्चा नव्हता. तो खूप हुशार होता. 1001 टक्के एमपीएससीने माझ्या मुलाचा बळी घेतला आहे, अशी प्रतिक्रिया देखील स्वप्नीलच्या वडिलांनी यावेळी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

अखेर शाळेची घंटा वाजणार! उद्यापासून राज्याच्या ‘या’ भागातील शाळा सुरू

सनी लिओनी म्हणते,”हा प्रसिद्ध चित्रकार कोण?”; अनिल कपूरनं दिलं भन्नाट उत्तर

Omicron Alert: जागतिक आरोग्य संघटनेनं दिला ‘हा’ गंभीर इशारा

भारतीय सैन्याला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू झरारचा खात्मा

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! महागाईने तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More