धक्कादायक!!! ‘पद्मावती’च्या विरोधासाठी हत्या की आत्महत्या???

जयपूर | दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला होणारा विरोध धक्कादायक पातळीवर पोहोचला आहे. जयपूरच्या नहारगड किल्ल्यावर बुरुंजाला लटकलेला एक मृतदेह सापडला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहाच्या शेजारी भिंतीवर ‘हम सिर्फ पुतले नहीं जलाते, लटकाते है’ असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे पद्मावतीच्या विरोधासाठी केलेली ही हत्या आहे की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झालाय. 

पद्मावती सिनेमात राणी पद्मावतीचं चुकीचं चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे राजपूत समाज आक्रमक झालाय. मात्र आता पद्मावतीच्या विरोधासाठी विरोधकर्ते धक्कादायक मार्ग अवलंबत असल्याचं दिसतंय.