बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नवी दिल्ली | दिल्ली जवळ संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटजवळ पोलिस बॅरिकेटला मृतदेह बांधलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हात तोडून एका 35 वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. शिवाय तरूणाच्या शरिरावर जागोजागी धारदार शस्त्राने वार केल्याचं आढळलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आाला आहे.

मृतदेह आढळल्यानंतर ताबडतोब कुंडली पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह सध्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोनिपतमधील कुंडलीत संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी मुख्य टेटंच्या जवळ पोलिस बॅरिकेटला सकाळी 5 वाजता एक मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाचे हात तोडण्यात आले होते. शिवाय शरीरावर शस्त्राने अनेक वार केल्याचंही आढळून आलं आहे. मात्र या तरूणाची हत्या करणाऱ्यांचा तपास अजून लागलेला नाही.

कुंडली पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. सकाळी 5 वाजता ही घटना घडली असून घटनेला कोण जबाबदार आहे? याची माहिती मिळू शकलेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”

‘निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान’; संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

“बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत”

“गोव्यात जिंकणारा पक्ष लोकसभेतही विजयी होतो, आम्ही दोन्ही ठिकाणी बाजी मारू”

‘गर्व से कहो हम हिंदू है’; शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेनं सेनेला डिवचलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More