बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी!

मुंबई | आपण आतापर्यंत इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरला नसेल तर तो त्वरित भरुन टाकावा कारण इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत चालली आहे. वेळेवर जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरला नाहीतर पुढे तुम्हालाच दंड आणि उशिरा भरल्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. या महिन्याची शेवटची तारीख म्हणजे 31 जुलै ही इनकम टॅक्स रिटर्न (ITR File) भरण्याची अंतिम तारीख आहे.

नियमित करदाते (Regular Tax Payers) आणि नॉन ऑडिटेबल (Non Auditable Tax Payers) अशा करदात्यांना 2020-21 या वित्तीय वर्षासाठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी आहेत. बरेच लोक इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पहात आहेत. त्यांना वेळेत इनकम टॅक्स रिटर्न भरण्याचे आवाहन शासनाने केले आहे.

मागील दोन वर्षात कोरोना महामारीने विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेमुळे शासनाने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी विशेष मुदत दिली होती. त्यामुळे करदात्यांना यंदाच्या वर्षी देखील मुदत वाढवून मिळेल अशी आशा असल्याने ते इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी वेळकाढूपणा करत आहेत. परंतु ऐनवेळी शासनाने तारीख न वाढवल्यास नवा पेच निर्माण होऊ शकतो.

मागील वर्षी कोरोना महामारी (Covid – 19) आणि अचानक संकेतस्थळावर आलेल्या बिघाडामुळे इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तारीख वाढवून मिळाली होती. आता सर्व काही सुरळीत सुरु असल्याने मुदत वाढवून मिळण्याची शक्यता कमी आहे.

थोडक्यात बातम्या –

‘राजीव गांधींप्रमाणे क्रांती करण्यासाठी ते खातं…’; उद्धव ठाकरेंचा खुलासा

“बरं झालं मोठा दगड ठेवला नाही, नाहीतर जीवच गेला असता”

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”

धनुष्यबाण चिन्हाबाबत दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More