बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘प्रिय अण्णा….,अर्थव्यवस्था ढासळलीय’; जितेंद्र आव्हाडांच्या हजारेंना हटके शुभेच्छा

मुंबई | जेष्ठ समाजसेवक म्हणून ओळख असणारे अण्णा हजारे यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. देशभरातून आज हजारेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक बड्या नेत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अण्णांना शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्या हटके अंदाजात अण्णांना शुभेच्छा दिल्या आहेत. हजारेंना शुभेच्छा देताना आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे.

प्रिय अण्णा.. प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोनामुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता, असं आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आव्हाड यांनी या ट्वीटबरोबर अण्णा हजारे यांचा एक फोटो देखील शेेअर केलं आहे. जितेंद्र आव्हाडांचं हे ट्वीट खूप वेगानं व्हायरल होत आहे. अनेक लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आव्हाडांच्या या हटके शुभेच्छांनंतर हजारे काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान,  केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना अण्णा हजारे यांनी अनेक आंदोलने केली होती. मात्र, भाजप सत्तेत आल्यापासून अण्णा हजारे यांनी मवाळ भूमिका घेतल्याने अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होत असते. सध्या देशात एवढी महागाई वाढली असताना अण्णा हजारे गप्प असल्यानं देखील अनेकवेळा त्यांच्यावर निशाणा साधला जातो.

थोडक्यात बातम्या – 

मराठा आरक्षणासाठी वंचितचा एल्गार! मराठा मोर्चात स्वत: प्रकाश आंबेडकर उतरणार

कंगना रणौतला दिलासा नाहीच, हायकोर्टानं पुन्हा फटकारलं

अनोखं संशोधन! आसपास कोरोना रुग्ण असेल तर 15 मिनिटांत वाजणार अलार्म

मनसुख हिरेन प्रकरणातील स्फोटकांनी भरलेल्या कारचं लातूर कनेक्शन उघड

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार चाहत्यांच्या भेटीला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More