बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक | कोरोनाची लागण झालेल्या आणि उपचारासाठी वणवण फिरलेल्या पालघरमधील नवजात बाळाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला.

अश्विनी काटेला यांनी सहा दिवसांपूर्वी पालघर शहरातील एका खाजगी दवाखान्यात नवजात बाळाला जन्म दिला. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते म्हणून त्याला पालघरच्या एका दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं. तेथे बाळाची अँटीजन टेस्ट केल्यानंतर बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

उपचारासाठी अनेक तास वाट बघितल्यानंतर बालकाला जव्हार येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आलं. बाळाची प्रकृती खालावल्याने आणि जव्हार रुग्णालयात उपचार पद्धती उपलब्ध नसल्याने बाळाला दोन दिवसानंतर जव्हार येथून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, आज पहाटे 5 च्या दरम्यान बाळाने शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. गेले सहा दिवस हे बाळ मारणाशी झुंज देत होतं. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

राष्ट्रवादीच्या आमदारानं उडवली संजय राऊतांची खिल्ली, म्हणाले मी तर आता घाबरलो!

सनी शॉटसाठी तयार होत असताना मागून एकाने…; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

कौतुकास्पद! पुण्यात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा उपक्रम

पुण्यात सोमवारपासून नवे नियम लागू; जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More