पुणे | पुण्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावाजवळ चालू क्रिकेटच्या सामन्यात दु:खद घटना घडली आहे. बाबु नलावडे नावाच्या खेळाडूला मैदानावर हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यु झाला आहे. वयाच्या 47 व्या वर्षी बाबूवर काळाने घाला घातला.
जाधववाडी येथे टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती. ओझर आणि जांबुत या दोन सघांमध्ये सामना चालू होता. यावेळी ओझर संघ फलंदाजी करत होता. या संघाचा प्रमुख खेळाडू बाबू नलावडे फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र काही वेळाने तो नॉन स्टाईकला उभा असताना अचानक खाली कोसळला. बाबूला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता.
खाली पडल्यावर बाजूचे खेळाडू त्याच्याजवळ धावत गेले आणि त्याला लगोलग नारायणगावला रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र बाबूचा रूग्णालयात नेण्याआधीच मृत्यु झाला होता. नलावडेच्या मृत्यूने क्रिकेट विश्वाला अतिशय जबर धक्का बसला आहे.
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना अशाप्रकारे जगाचा निरोप घेतल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहताना काळजाचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही.
काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ #Cricket #क्रिकेट #म pic.twitter.com/hYcIrOl9Bc
— Harish Malusare (@harish_malusare) February 17, 2021
थोडक्यात बातम्या-
‘पूजा अरूण राठोड’ नावाने यवतमाळ जिल्ह्यात गर्भपाताचा प्रकार!
पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार का?; मुरलीधर मोहोळ म्हणाले…
बाबो! चालू मिटींगमध्ये बायकोला आवरला नाही नवऱ्याला किस करण्याचा मोह अन…; पाहा व्हिडीओ
शिवजयंती निमित्त खासदार अमोल कोल्हेंनी केला नवा संकल्प!
‘तु बोलतो किती, तुझी औकात किती….’; अमोल मिटकरींची पडळकरांवर बोचरी टीका