बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आई आणि मुलाचा कोरोनाने मृत्यू, बाप अत्यवस्थ; पत्नी आणि मुलगीही पॅाझिटिव्ह

पालघर | कोरोनामुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोना विषाणू इतका भयंकर आहे की आपल्यातील रोजची डोळ्यासमोरील लोक मरण पावत आहे. फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागातही कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. या कोरोनाने काही कुटुंबच्या कुटुंब संपवली आहेत. अशातच पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातील ऐनशेत गावात ठाकरे कुुटुंबावर कोरोनाने आघात केला आहे.

ऐनशेत गावात सरिता सदानंद ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यासोबतच त्यांच्या पतीलाही लागण झाली. त्यानंतर सरिता यांना भिवंडी इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पतील रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये केलं होतं. मात्र सरिता यांचा 10 एप्रिलला उपचारावेळी मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युच्या तिसऱ्याच दिवशी मुलगा सागरलाही कोरोनाची लागण झाली.

सागरला कल्याणमधील दवाखान्यात दाखलं केलं. त्यानंतर सागरची पत्नी आणि मुलीलाही कोरोनाची बाधा झाली. उपचारादरम्यान सागरची परिस्थिती सुधारत असताना अचानक त्याचाही बुधवारी कोरोनाने मृत्यु झाला. सागरची आई म्हणजे सरिता यांच्या बाराव्या विधीला 34 वर्षाच्या सागरचा मृत्यु झाला. या घटनेेने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली आहे. सागरच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

दरम्यान, वाडा तालुक्यातील कोरोनाचा हा 60 बळी होता. तालुक्यातील नागरिकांनी कोरोनावर उपचार होतील अशा अत्याधुनिक व्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहेे. वाडा तालुक्यातील घटनेने कोरोनाचं गांभीर्य आणि भाती गडद केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत”

सोशल मीडियावरही रुजतेय वाचनसंस्कृती, ‘वाचनवेडा’ फेसबुक ग्रुप करतोय कमाल!

“साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी”; शरद पवारांचं सर्व कारखान्यांना पत्र

आता आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी लागणार ई-पास; जाणून घ्या ई-पास कसा काढायचा?

“ज्या दिवशी उपमुख्यमंत्रिपद जाईल त्या दिवशी…”; निलेश राणेंचा अजित पवारांवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More