बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आईचा कोरोनाने मृत्यू; बातमी कळताच मनाला सावरत स्वत:च्या कामाची जबाबदारी अगोदर पूर्ण केली

लखनऊ | कोरोनाकाळात पोलीस, डॉक्टर सोबतच रुग्णवाहिका चालकही आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहे. कोरोनाने कित्येक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना उत्तरप्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात घडली आहे. प्रभात यादव हे गेल्या 9 वर्षांपासून 108 रुग्णवाहिका सेवांसाठी कर्तव्य बजावत आहेत. प्रभात आपल्या कर्तव्यावर असताना सकाळी 6 वाजता कोरोनामुळं त्यांच्या आईचं निधन झाल्याची बातमी त्यांना कळाली. मात्र, स्वतःला सावरत प्रभात यांनी स्वत:च्या कामाची जबाबदारी अगोदर पूर्ण केली.

कोरोनाकाळात लोक त्यांच्या जवळच्या लोकांपासून दूर राहत आहे. कित्येकांना मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांचा खांदा मिळण्याचंही नशीब राहिलेलं नाही. अशा कोरोना काळातही कोरोना वॉरियर्स स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा करत आहेत. रुग्णवाहिका चालक प्रभात यादव यांच्यासोबतही असच काही घडलं आहे. ते उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील चुरहेला गावचे रहिवासी आहेत. ते सध्या मथुरा जिल्ह्यात तैनात आहेत. त्यांच्या आईचं कोरोना संसर्गाने निधन झालं. मात्र, प्रभात यांनी स्वत:च्या मनाला कणखर बनवत आपलं कर्तव्य पार पाडलं आणि मग ते आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले. प्रभात यांचे वडील आणि भाऊ यांचाही गेल्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू झाला होता.

आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्रभात लगेचच आपल्या कर्तव्यावर निघाले. मथुरेच्या 102 आणि 108 रुग्णवाहिका सेवांचे प्रोग्राम मॅनेजर अजय सिंह यांना ही घटना कळताच प्रभात यांना घरीच राहण्यास सांगितले होते, पण प्रभात थांबले नाहीत. दुसर्‍या दिवशी 1:30 वाजता प्रभात परत आले आणि सकाळची शिफ्ट घेतली. प्रभातच्या वडीलांचा आणि भावाचा गेल्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू झाला होता. तेव्हाही प्रभात एका दिवसासाठी घरी आले आणि  लगेचच कामावर गेले होते.

दरम्यान,  प्रभात यादव यांच्या कर्तव्यनिष्ठेनं सगळेच भारावून गेले आहेत. या कोरोनाकाळात लोकं जाणिवपुर्वक घरी राहत आहेत. मात्र, प्रभात यांनी आईचा मृत्यू झाल्यानंतरही आपलं कर्तव्य सर्वोतपरी ठेवलं आहे. आजही ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. रोज वेळेवर रूग्णांना रूग्णालयात पोहचवत त्यांचा जीव वाचवत आहे.

थोडक्यात बातम्या –

शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून त्यानंतर केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“लाॅकडाऊन आपल्याला हळुहळु उघडावा लागेल, लगेचच सर्व काही उघडणार नाही”

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

‘रोहितने केलेल्या चूका तू करु नको’; भारताच्या ‘या’ मोठ्या माजी खेळाडूचा ऋषभ पंतला सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More