महाराष्ट्र मुंबई

लिफ्ट आलीच नाही पण सुरक्षारक्षकाच्या मृत्यूचं दार उघडलं!

प्रतिकात्मक फोटो

मुंबई | लिफ्ट न येताच दरवाजा उघडल्याने आणि न पाहताच आत शिरणाऱ्या सुरक्षारक्षकाचा 11 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. मुंबईतील बांद्रा भागात ही धक्कादायक घटना घडली. राधेश्याम हरिजन असं या सुरक्षारक्षकाचं नाव आहे.

11 मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी गाडीची चावी घेण्यासाठी तो गेला होता. चावी घेतल्यावर लिफ्टची वाट पाहत उभा असताना लिफ्टचा दरवाजा उघडला, मात्र त्याने लिफ्ट आली की नाही हे न पाहताच थेट लिफ्टमध्ये प्रवेश केला आणि तो खाली कोसळला.

दरम्यान, हरिजन यांना लगेच बांद्र्यातील भाभा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-…तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

-प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

-विराट कोहलीमुळे जर्मनीचा पराभव; इटलीच्या पराभवालाही तोच कारणीभूत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या