Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे. एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (Manoj Jarange)
एका युट्यूब चॅनेलच्या कॉमेंटमधून ही धमकी देण्यात आल्याने ऐन निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत. या कॉमेंटचा स्क्रिन शॉट देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार’ अशा आशयाची धमकी ही कॉमेंटमध्ये लिहिण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांना धमकी
बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे सध्या बसत असलेल्या सरपंच मळा येथील बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती आहे. जरांगे यांनी विधानसभेला मराठा उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. (Manoj Jarange)
गेल्या काही दिवसांपासून त्यांची अनेक मंत्र्यांनी, नेते मंडळींनी भेट घेतली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चांगलाच गाजला. त्यामुळे उमेदवार आता पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. जरांगे यांनी सर्व जागा न लढवता जिथे ताकद आहे, तिथं अर्ज भरा असं आवाहन सर्व समर्थकांना केलं आहे.
ऐन निवडणुकीत गेम करणार असल्याची धमकी
“ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच, ज्या ठिकाणी उमेदवार आपल्या विचाराचा असेल मग तो कोणत्या पक्षाचा असेल तरीही त्या उमेदवाराला आपण मदत करायची. तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही. पण, त्या उमेदवाराकडून स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असं लिहून घ्यायचं.”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अशात राज्यात विधानसभेची धामधूम असताना जरांगे यांना धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Manoj Jarange)
News Title : Death threat to Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या –
महाविकास आघाडीने आखला मोठा प्लॅन! सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार?
मावळमध्ये महायुतीत फुट, राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होताच भाजपचं राजीनामासत्र
आपला झेंडा, आपला अजेंडा! जरांगे पाटील आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काय ठरलं?
विधानसभा निवडणुकीवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य!
ग्राहकांना झटका! दिवाळीपूर्वीच सोनं गेलं 80 हजार पार?; जाणून घ्या आजचे भाव