ब्रेकिंग! PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ

Death threat to PM Narendra Modi

PM Narendra Modi | महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर अनेक राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचं समोर आलं. अभिनेता सलमान खानला तर काही दिवसांपासून जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. अशात थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच धमकी देण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. (PM Narendra Modi)

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. यामुळे मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास धमकीचा फोन आला. त्यात पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट असून हत्यारबाबतची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली.

एका महिलेला अटक

या फोन कॉलची पोलीस विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून त्याबाबत आता तपास केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात देखील घेतलं आहे. कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेने हा फोन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (PM Narendra Modi)

मात्र, याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. या धमकीच्या कॉलमुळे सर्वत्रच खळबळ उडाली होती. यापूर्वी देखील मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नामक व्यक्तीने यापूर्वी धमकी दिली होती. सोशल मीडियावर हातात तलवार घेऊन त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, असं हा व्यक्ती म्हणतात आढळून आला होता.

मोदींना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली-

अशात पुन्हा एकदा मोदींना जीवे मारण्याचा धमकीचा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस विभागाकडून संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. तिच्या विचारपुस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. मात्र, या फोन कॉलची आता सगळीकडे चर्चा होत आहे. (PM Narendra Modi)

News Title – Death threat to PM Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीतही तब्बल 10 हजारांची घसरण?; जाणून घ्या दर

पराभव जिव्हारी लागला, शहाजीबापू पाटलांची मोठी घोषणा!

विनोद तावडेंचं ‘राजकीय वजन’ वाढणार, भाजपकडून मोठी जबाबदारी

आधी डिलीट केलं ट्विट, आता म्हणतात बाबा तुमचा अभिमान वाटतो!

मध्यरात्री दिल्लीत खलबतं, ‘या’ बड्या नेत्याने अमित शाहांची भेट घेतल्याने CM पदाचा सस्पेन्स वाढला

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .