मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी, नागपुरात घडला धक्कादायक प्रकार

Death threat to Sushma Andhare

Sushma Andhare | शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी देखील केली आहे.

नेमकं काय घडलं?

सुषमा अंधारे या नागपूर येथे गेल्या होत्या. आज पहाटे त्या तिथून मुंबईसाठी निघाल्या होत्या. त्याच क्षणी विमानतळावर एक 6 फूट उंचीचा गंध लावलेला व्यक्ती त्यांच्यासमोर आला.या व्यक्तीने सुषमा अंधारे यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्या माणसाने जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या, असं सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या.

सुषमा अंधारेंची पोस्ट काय?

परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालु आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर departure gate ला विचित्र घटना घडली. मी, माझी 7 वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते. (Sushma Andhare)
साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेट वरील सुरक्षा रक्षक थोडे पुढें सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला.
देवेंद्र जी , आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. मात्र दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणुन आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणुन माझी जबाबदारी आहे असे वाटले. टीप :  शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी, अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. ही पोस्ट आता तूफान व्हायरल झाली आहे.

News Title :  Death threat to Sushma Andhare

महत्वाच्या बातम्या –

आज 12 पैकी कोणत्या राशीला मिळणार धन व समृद्धी?, वाचा राशीभविष्य

मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर थेट हल्लाबोल! जरांगे काय म्हणाले?

छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार? भुजबळांचं सूचक विधान होतंय तुफान व्हायरल

“आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं नेतृत्वावर केला हल्ला

मंत्रिपदापासून वंचित असलेले भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?, थेट म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .