पुणे मनसेत खळबळ; वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
पुणे | पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचं बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले आहे. याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे.
तुम्ही 30 लाख रुपये द्या अन्यथा योगेश मोरे यांना गोळ्या घालून ठार करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अल्पिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करून रुपेश मोरे यांच्याकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
वसंत मोरे यांच्या मुलाला अशी धमकी आली आहे. या धमकीमागे नेमकं कोण आहे ? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र होळीच्या दिवशी अशी घटना घडल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.
दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसात या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.