बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन्यथा तुला जीवंत सोडणार नाही’; पुण्यात स्पीड पोस्टद्वारे खंडणीची मागणी

 पुणे | पुण्यात एका व्यक्तीला अज्ञात आरोपीने स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. संबंधित अज्ञात आरोपीने आणखी एक मागणी केली आहे ज्यामुळे त्याला शोधणं फार कठीण नाही जाणार.

संबंधित व्यक्तीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. फिर्यादीने काही दिवसांपूर्वी एका बँक मॅनेजर विरोधात स्वारगेट पोलिसांत तक्रार दाखल केली होती. चौकशीमध्ये काहीही तथ्य न आढळल्याने केवळ अर्ज फाइल करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित बँक मॅनेजर विरोधात दिलेली तक्रार मागे घे, त्याचबरोबर 20 लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने माझ्या खात्यात जमा कर, अन्यथा तुला आणि तुझ्या कटुंबीयांना जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आली.

आरोपीने पत्र पाठवण्यासाठी स्पीड पोस्टाचा वापर केला होता. धमकीचं पत्र आल्यानंतर फिर्यादीने त्वरित न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयाने फिर्यादीची दखल घेत मार्केट यार्ड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. संबंधित पत्र नेमकं कोणी पाठवलं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र संबंधित बँक मॅनेजरवर पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून स्पीड पोस्ट पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर संबंधित खंडणीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितलं होतं. हे खातं नेमकं कोणाचं आहे, याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मोदी ‘त्या’ विद्यार्थ्याला म्हणाले, “तुम्हाला भविष्य समजते का?”

लस घेण्यासाठी काहीपण; ‘या’ अभिनेत्रींबद्दल धक्कादायक माहिती आली समोर

“कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास तो नष्ट होईल”

महिला म्हणाली, “शाहरुखला भेटूनही इतका आनंद झाला नाही!; मोदींचं स्मितहास्य…

35 वर्षाय महिलेकडून 16 वर्षाच्या मुलावर… अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More