बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमरनाथ ढगफुटीतील मृतांचा आकडा वाढला, महत्त्वाची माहिती समोर

श्रीनगर | दक्षिण काश्मीर भागातील अमरनाथ गुफेच्याजवळ ढगफुटी होऊन 15 भाविकांचा मृत्यू झाला तर या दुर्घटनेतील अजून 40 लोक बेपत्ता आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही ढगफुटी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अमरनाथ गुफेजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास ही ढगफुटी झाली. येथे मुसळधार पाऊस देखील सुरू असून त्यामुळे येथे तंबू आणि प्रसादघरे तुटून गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी NDRF, CRPF, BSF आणि पोलीस बचावकार्य करत आहेत, बेपत्ता लोकांचा तपास युद्धपातळीवर सुरु असून सर्वच तुकड्या बचाव कार्यात लागल्या आहेत, अशी माहिता दिली. इंडोतिबेटीयन सीमा पोलिसांचे जवान देखील या ठिकाणी मदतीला धाऊन आले आहेत.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी प्राथमिक माहिती दिली आहे. ढगफुटीमुळे गुफेंच्या पायथ्यानजीकच्या यात्रातळावरील काही लंगर आणि आणि तंबूंचे नुकसान झाले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि बचावकार्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

काश्मीरचे विभागीय आयुक्त के. पांडूरंग पोळे यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अनंतनाग आणि गांदेरबलचे मार्ग सुरु आहेत, तसेच या भागातील वीजपुरवठा आणि संपर्क कायम आहे, त्यात कोणताही खंड पडला नाही, अशी माहिती पोळे यांनी दिली.

थोडक्यात बातम्या – 

अमरनाथमध्ये ढगफुटी; आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू

‘खाली काही घातलं की नाही?’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल

‘मी व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलाय, रिस्क असते पण…’; रणवीरने सांगितला तो किस्सा

अभिनेता सुमीत राघवनने महाराष्ट्र सरकारला केली विनंती, म्हणाला…

राज्यातील ‘या’ भागांना रेड अलर्ट जारी, पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More