बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षातच होणार मृत्यू?; जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागचं सत्य

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. अशातच कोरोना लसीकरणासंदर्भात अनेक खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. यामध्ये व्हॅक्सिन घेणाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं जात आहे.

नुकतीच अशीच एक बाब सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फ्रेंच नोबेल पुरस्कार विजेते लुस मॉन्टॅग्निअर यांच्या नावाने दावा केला आहे की, जो कोणी कोरोना लस घेईल त्याचा मृत्यू होईल. अनेक लोक या मेसेजला इतरांना पाठवत आहेत. मात्र सरकारी संस्था असणाऱ्या पीआयबीने या दाव्याबाबत पडताळणी केली, त्यानंतर पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितलं.

या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये ‘लस घेणारे सर्व लोकं दोन वर्षाच्या आतमध्ये मरतील. नोबेल विजेता ल्यूक माँटेनिअर यांनी अशी पुष्टी केली आहे की, ज्या लोकांना व्हॅक्सिन देण्यात आलं आहे ते वाचतील, अशी शक्यता कमी आहे. धक्कादायक हे की जगातील अव्वल व्हायरलॉजिस्टने स्पष्टपणे सांगितले आहे. अशा लोकांसाठी कोणतीही आशा नाही आणि ज्यांना यापूर्वी लस दिली गेली आहे, त्यांच्यावर उपचार संभव नाही. आपल्याला आता मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले पाहिजे.

दरम्यान, पीआयबीनं ही चुकीची माहिती उघडकीस आणून, आपल्या फॅक्ट चेकमध्ये ही व्हायरल पोस्ट खोटी असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीनं पुढे असंही सांगितलं की, कोविड-19 लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच अशी चुकीची माहिती सत्यता तपासल्याशिवाय पुढे पाठवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!

रक्षकच बनला भक्षक! पती कोरोनामुळे रुग्णालयात असल्याची संधी साधत पोलिसाने केला महीलेवर बलात्कार

“भाजपनेच मराठा आरक्षण दिलं आणि संभाजीराजेंना खासदारही केलं”

संतापजनक! वरातीसोबत आलेल्या तरुणाने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

‘या’ शिवसेना आमदाराची गाडी त्यांच्याच घरासमोर पेटवण्याचा प्रयत्न

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More