बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला ब्रिटिश कोर्टाचा दणका!

नवी दिल्ली | भारतातील वेगवेगळ्या बॅंकांकडून कोट्यवधींची फसवणूक करुन लंडनला फरार झालेला किंग्जफिशर एअरलाईन्सचा मालक विजय माल्ल्याला लंडन उच्च न्यायालयात मोठा झटका बसला आहे. ब्रिटनमधील न्यायालयानं भारतातून फरार झालेल्या माल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं आहे. त्यामुळे आता भारतीय बँका विजय माल्ल्याच्या मालमत्तांवर आरामात कब्जा करू शकणार आहे.

विजय माल्ल्याच्या विरोधात भारतीय स्टेट बॅंक आणि इतर काही बॅंकांनी ब्रिटिश कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये विजय माल्ल्यानं बँकांमधून कर्ज घेतलं असून त्याची परतफेड केली नसल्यामुळे त्याला दिवाळखोर जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भारतातील बँकांनी केली होती. ही मागणी लक्षात घेता ब्रिटिश न्यायालयानं माल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं आहे.

ब्रिटिश न्यायालयानं माल्ल्याला दिवाळखोर घोषित केलं असलं तरी या निर्णयाविरोधात माल्ल्या एक अपिल करु शकतो. त्यामुळे माल्ल्याचे वकील लवकरच या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, माल्ल्याला दिवाळखोरी जाहीर झाल्यानंतर त्याची बँकांकडे असणारी संपत्ती आणि इतर संपत्तीदेखील जप्त करून, त्याचा लिलाव करण्याचा अधिकार बँकांना प्राप्त होतो. या सोबतच माल्ल्यानं असा दावा केला की भारतीय बँकांनी दाखल केलेली दिवाळखोरी याचिका कायद्याच्या कक्षेत नाही. त्यामुळे भारतातील त्याच्या मालमत्तेच्या सुरक्षेवर हात घातला जाऊ शकत नाही, असंही माल्ल्यानं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ मोठे निर्देश

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतात…

चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही होतोय कोरोना संसर्ग

मुख्यमंत्री लवकरच निर्णय जाहीर करतील – राजेश टोपे

खासगी शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी होणार?, राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More