बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाने रेल्वेची चेन ओढली…. डेक्कन, प्रगती, हावडा, दुरांतो एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रद्द!

मुंबई |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. कोरेनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचं मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अश्या शहरांना जोडणाऱ्या एकूण 23 गाड्या मध्य रेल्वेने रद्द केल्या आहेत. यामध्ये राजधानी एक्सप्रेससोबत डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस दुरांतो एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस मध्य रेल्वेने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर-पुणे, निजामबाद एक्सप्रेस, पुणे-नागपूर, भूसावळ-नागपूर या रेल्वे गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. महाभयानक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन शासन वारंवार करत आहे. मात्र गर्दी काही कमी होताना दिसून येत नाहीये. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढवले आहेत. 10 रूपयावरून हे दर रेल्वेने 50 रूपये केले आहेत. यामुळे तरी आता प्लॅटफॉर्मवरची किंवा स्टेशनवरची गर्दी कमी होईल, अशी आशा रेल्वे प्रशासन करत आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!

महत्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण?

बाबासाहेब बघताय ना… गोगोईंच्या राज्यसभा नियुक्तीवर आव्हाडांचा निशाणा

पहिल्यांचा शपथ घेऊ द्या मग सांगतो मी का राज्यसभेवर जातोय…- रंजन गोगोई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More