‘एसटी संपावर लवकर निर्णय द्या, अन्यथा…’; सदाभाऊ खोत आक्रमक
मुंबई | गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. विलीनिकरनाच्या मुद्द्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांनाही मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. न्यायालयाने नियुक्त केलेल्या या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत मांडला. आता सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढला नाही तर एसटी कर्मचारी उद्या राज्यात सर्वत्र राज्य सरकारचा पुतळा दहन करतील. राज्य सरकारचा निषेध करतील, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
पुढील दोन दिवसांत योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलन करु, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. दिवाळीपासून हे एसटी संप सुरु आहे. अद्यापही याचा तिढा सुटेना त्यामुळे सरकार काय निर्ण घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचं बंद करा”
दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
“नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही, दाऊदचा दबाव आहे का?”
अजित पवारांना झटका! पवारांच्या जवळच्या व्यक्तीशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा
‘महाविकास आघाडीतील 25 आमदार नाराज’; संजय राऊत म्हणाले…
Comments are closed.