बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुद्धी पाहूनच शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवा- इंदुरीकर महाराज

जळगाव | शासकीय कर्मचाऱ्यांच्या बुद्धीचं मोजमाप करुनच त्यानुसार त्यांचे पगार ठरवले गेले पाहिजेत, असं वक्तव्य प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं आहे. जळगाव शहरातील पिंपळा येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सरकारी विभागानं जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मचाऱ्यांची बुद्धी मोजली पाहिजे व त्यानुसार त्यांचा पगार ठरवला पाहिजे, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे. जो कष्ट करतो त्याला पगार कमी, आणि बुद्धी चेक करुन पगार दिला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्व वारकरी एकत्र आले तर देश बदलू शकतात, विज्ञाना बरोबर अध्यात्म द्या पुढची पिढी घडेल अशा विविध विषयांवर त्यांनी आपल्या किर्तनातून मुद्दे मांडले.

थोडक्यात बातम्या- 

‘लवकर तुझा सिद्धू मुसेवाला करणार’; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

“काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”

राज्यातील शाळा बंद होणार का?, वर्षा गायकवाडांनी स्पष्टचं सांगितलं

पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्याची आठवण करून देत काँग्रेसची भाजपवर टीका, म्हणाले…

रोहित पवार मंत्री होणार का?, शरद पवार स्पष्टच बोलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More