ठरलं! ‘या’ दिवशी अथिया-केएल राहुल बांधणार लग्नगाठ

मुंबई| गेल्या अनेक दिवसांपासून बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल(KL Rahul) रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु या सगळ्या अफवा असल्याचं त्या दोघांनी सांगितलं होतं.

आता पुन्हा एकदा केएल राहुल-अथिया लग्नगाठ बांधणार आहे, अशा चर्चा आहेत. पण यावेळी ही माहिती दोघांच्या जवळच्या सूत्रानं दिली आहे. या सूत्रानं या दोघांच्या लग्नाची तारीखही सांगतिली आहे.

सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, 21 ते 23 जानेवारी दरम्यान दोघं थाटामाटात लग्न करणार आहेत. हा लग्नसोहळ्याचा कार्यक्रम तीन-चार दिवस चालणार आहे. यामध्ये मेहंदी,हळद, संगीताचे कार्यक्रमही होणार आहेत.

या दोघांचं लग्न पारंपारिक दक्षिणात्य पद्धतीनं होणार असल्याच्या चर्चा आहेत. हे लग्न सुनिल शेट्टीच्या खंडाळ्यातील ‘जहान’ या बंगल्यावर धुमधडाक्यात होणार आहे. त्यामुळं दोघांचं लग्न पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

दोघांनी लग्नाची तयारीदेखील सुरू केली आहे,असं म्हणलं जात आहे. परंतु दोघांनीही यावर अद्याप कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळं हे लग्न याच दिवशी होणार का यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही.

दरम्यान, सुनिल शेट्टीला काही दिवसांपूर्वी मीडियानं अथिया-केएल राहुलच्या लग्नाविषयी विचारणा केली होती. यावर सुनिल शेट्टीनं (Sunil Shetty)लग्न लवकरच होईल, असं उत्तर दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .