ठरलं! ‘या’ दिवशी सिद्धार्थ-कियाराचं लग्न होणार थाटामाटात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी(Kiara Advani) अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळं ते लग्न कधी करणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

अखेर आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण लवकरच कियारा-सिद्धार्थ राजस्थामधील जैसलमेर येथे लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांच्या कुटुंबियांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

सिद्धार्थ-कियारा 6 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. तसेच हळदीचे, मेहंदीचे कार्यक्रमही होणार आहेत. अनेक बाॅलिवूड कलाकार या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

सध्या सिद्धार्थ दिल्लीत आहे. कारण त्याचे कुटुंबिय दिल्लीत राहते. तो लवकरच दिल्लीतून थेट आपल्या कुटुंबियांसह लग्नाच्या स्थळी पोहचणार आहे. तर कियाराही आपल्या कुटुंबियांसह विवाहस्थळी पोहचणार आहे.

दरम्यान, सिद्धार्थ-कियाराची ‘शेरशाह’ या चित्रपटातील केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती. त्यामुळं या जोडीला रिअल लाईमध्ये एकत्र होताना पाहून चाहते खूप खुश होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-