बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाईट कर्फ्यूच नाही तर ‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 28 मार्चपासून जमावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती झाली तर संबंधित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याची मुभा त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. अशातच राज्यातील एका जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत मोठा निर्णय घेतला आहे. अभिजीत राऊत यांनी 28 मार्चपासून 30 मार्चपर्यंत विशेष निर्बंध लावले आहेत. 28 आणि 29 मार्चला होळी आणि धुलिवंदन असल्याने कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडण्याच्या शक्यतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता गृहित धरून हा निर्णय घेतला आहे.

ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगानं वाढतं आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणं सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचना मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

दरम्यान, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पुन्हा दिपाली चव्हाण होऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की न्याय देतील”

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! ‘राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी’

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात ‘संधींची त्सुनामी’- मुकेश अंबानी

बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात मलाही अटक झाली होती- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More