बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडातात्या कराडकर यांना समजावण्यात अखेर पोलिसांना यश; पायी वारीचा निर्णय मागे

पुणे | ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर शुक्रवारी सकाळी आळंदीतील वारीत दाखल झाले होते. तसेच यावेळी नियम डावलून पायवारीला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी बंडातात्या जिथे दिसतील तिथून त्यांना ताब्यात घ्या, असे आदेश दिले होते. त्यानंतरही बंडातात्या वारीत सहभागी झाले.

सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असंही आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. त्यामुळे काहीसा तणाव वाढला होता.  मात्र आता बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीचा निर्णय मागे घेतला आहे. पोलिसांच्या शिष्टाईनंतर बंडातात्या कराडकर यांनी हा निर्णय घेतलाय. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केलं.

दरम्यान,यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना वारीत प्रत्यक्ष हजर राहून दर्शन करता येणार नाहीये. प्रातिनिधिक स्वरुपात मोजक्या वारकऱ्यांना वारीला परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे या वारकऱ्यांसह देहूतून तुकाराम महाराज आणि आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतंय.

थोडक्यात बातम्या- 

ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला, पुन्हा कडक लॉकडाऊन

‘…तर मला आधी मुख्यमंत्रिपदावर बसवा’; छत्रपती संभाजीराजे भोसलेंचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

अखेर ठरलं! बारावीच्या निकालाचा ‘असा’ असणार फॉर्म्युला, शालेय शिक्षण विभागानं दिली माहिती

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस??; अमित शहांसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More