बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार, बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

मुंबई | शिवसेनेेचे आमदार आणि नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली. त्यांच्या गटात जाण्यास 40 आमदारांनी पसंती दर्शवली. त्यांनी त्यांच्या गटातील आमदारांसह भाजपसोबत युती करत महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन केले. त्यानंतर अखेर एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. आता शिवसेनेचे काही खासदार देखील बंडखोरीचा पवित्रा घेऊन उभे आहेत.

ठाकरेंचं सरकार कोसळण्यापूर्वी शिवसेनेनं आपल्या अधिकारात 16 आमदारांवर पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी कारवाई केली होती. शिंदे गटाने या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले. त्यानंतर न्यायालयाने आमदारांना दिलासा देत निकालाची तारीख 11 जुलै दिली. न्यायालयाने आणखी एक धक्का शिवसेनेला दिला, तो म्हणजे तात्काळ बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात. त्यात शिवसेनेने मात खाल्ली. कारण पक्षाच्या 40 आमदारांनी पक्षाचा व्हिप पायदळी तुडवत भाजपच्या बाजूने मते दिली.

शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी शिवसेनेला संपविण्याचा विडाच जनू उचलला आहे. त्यांनी विधानसभेत आणि बाहेर देखील आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना असे म्हटले आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणती, असा संभ्रम जनमाणसांत निर्माण झाला आहे. दरम्यान, शिंदे गटाने शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे आपल्या शिंदे गटाला मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील येणारा काळ लक्षात घेता, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवीन चिन्ह स्वीकारुन ते घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी ठेवा, असे आवाहन केले आहे. आज न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेचे प्रमाणे शिंदे सरकारचे देखील भविष्य ठरणार आहे. ज्याप्रकारे शिंदे गटासाठी सर्व काही अनुकूल होत गेले. त्याअर्थी जर आजचा निकाल देखील त्यांच्या पक्षात लागला तर, शिवसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 11 जुलैैचा निकाल हा शिवसेनेचे आणि देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवेल असे म्हंटले आहे.

थोडक्यात बातम्या – 

वारकऱ्यांसाठी पंढरपूरात दानवे बनले चहावाला, दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

‘वाय’ चित्रपटाने प्रेरित होत कोल्हापुरातील दाम्पत्याने साजरा केला बारशाचा अनोखा कार्यक्रम

ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा स्थगित, प्रशासनाकडून महत्त्वाचे आदेश जारी

‘एखाद्या हिरोईन सोबत लग्न लावून दे ना’, चाहत्याच्या अजब मागणीला सोनू सूदचं भन्नाट उत्तर

उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More