देश

हॉटस्पॉट वगळता 4 मे रोजी लॉकडाऊन उठणार? रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक मात्र बंद राहणार?

Loading...

मुंबई |  येत्या 3 मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येणार आहे. मात्र असं असलं तरी देशातली कोरोनाग्रस्तांची संख्या काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीये.  देशातल्या अनेक ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट आहेत. याच हॉटस्पॉटपुरतं मर्यादित लॉकडाऊन ठेऊन इतर ठिकाणचं लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहे, असं प्राप्त परिस्थितीत कळतंय. मात्र रस्ते, रेल्वे अन् विमान वाहतुक बंद राहणार आहे.

सोमवारी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हीडिओ कॉन्फरनन्सिंगद्वारे चर्चा झाली. ग्रीन झोनमधील ठिकाणांवरचं लॉकडाऊन उठवण्यावर पंतप्रधान आणि बऱ्याच मुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झालं आहे.

ग्रीन झोनमधील लॉकडाऊनच्या सवलतीच्या घोषणा 3 मे रोजीच होण्याची शक्यता वर्तवली जातीये. दुसरीकडे रेड झोनला ऑरेंज झोनमध्ये कसं आणता येईल आणि ऑरेंज झोनला ग्रीन झोनमध्ये कसं कनव्हर्ट करता येईस, याची पराकष्ठा शासन आणि प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, आणि मालेगाव हे कोरोना हॉटस्पॉट आहेत. याठिकाणचं लॉकडाऊन 3 तारखेला शिथील होणार नाही, अशी माहिती कळतीये. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मते येथील लॉकडाऊन 18 मे पर्यंत कायम राहिल. लॉकडाऊनबाबात शनिवारी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय?”

“यापुढे राज्य सरकारांना सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय सेवा आणि शिक्षणावर सर्वाधिक खर्च करावा लागेल”

महत्वाच्या बातम्या-

“नागरिकांनो घाबरू नका, आतापर्यंत 1282 कोरोनाबाधित ठणठणीत बरे झालेत!”

राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 एसटी बस पाठवणार- परिवहन मंत्री

महाराष्ट्र हा देशाचा आर्थिक कणा; हा कणा मोडू नका हेच पवारांनी केंद्राला सांगितलंय- संजय राऊत

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या