बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचा येत्या 2 दिवसात निर्णय होणार; राजेश टोपेंचं मोठं स्पष्टीकरण!

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यावर येत्या दोन दिवसात निर्णय होणार आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच नागपूर या मुख्य शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस हजारोंनी वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे. प्रशासनातर्फे काही ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याने आता कडक लॉकडाऊन करण्यात येऊ शकतं, असे स्पष्ट संकेत स्वतः आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यापूर्वी जनतेला काही दिवस दिले जातील आणि त्यानंतर लॉकडाऊन केलं जाईल. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याने आता सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे लागलं आहे.

इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या बाबतीत लपवाछपवी होत असेल पण महाराष्ट्रात अशा प्रकारची कोणतीही आकड्यांच्या बाबतची लपवाछपवी होत नसल्याचंही  आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आरोग्य मंत्री आता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही”

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर पुण्याच्या महापौरांचा ‘हा’ मोठा निर्णय

राष्ट्रवादी आक्रमक; परमबीर सिंह यांच्या संपत्तीबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या ‘छ‍िछोरे’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण ‘एनआयए’कडे

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More