बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाड्यातील ‘हा’ जिल्हा संपूर्णत: लॉकडाऊन होणार; पालकमंत्र्यांनी दिले आदेश

नांदेड | महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत असून त्याला रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन करून पाहिला, पण कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने आता संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून नागरिकांना प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यासही सांगितलं. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 मार्चला 591 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आणि जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 18 मार्चपासून जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, बेकरी, जिम व उद्यानं बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता.

प्रशासनातर्फे खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना वारंवार करण्यात येऊनही कोरोना आटोक्‍यात येत नसल्याने पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी यासंबंधी चर्चा केली आणि चर्चेअंती नांदेड जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात यावे असे आदेश दिले. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार 25 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत संपूर्ण नांदेड जिल्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्याबरोबरच संचारबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत.

सर्व किराणा दुकानदार आपली दुकाने या लॉकडाउन काळामध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवू शकणार आहेत. तसेच दूध विक्री करणारे सकाळी दहा वाजेपर्यंतच घरपोच दूध विक्री करू शकणार आहेत. तसेच फळभाजी विक्रेत्यांनाही सकाळी सात ते दहा या वेळेत फिरून विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये फिरण्यासाठी नागरिकांवर पूर्णतः बंदी असणार आहे त्याबरोबरच शासकीय कर्मचारी अत्यावश्यक सेवेत काम करणारे व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

बसा बोंबलत! ‘पॉर्न’ बघणाऱ्या मुलाला किम जोंगने दिली ‘ही’ शिक्षा

अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध- विनायक राऊत

शरद पवारांकडून गृहमंत्र्यांना क्लीनचीट, मात्र काँग्रेस म्हणते मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा!

मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल- शरद पवार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More