बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारचा मोठा निर्णय! समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा

मुंबई | देशात मागील काही दिवसांपासून मुंबईतील कथित कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या तुफान राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे सध्या आरोपांच्या फेऱ्यात अडकताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत.

एनसीबीचे कथित कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यालयाने घेतला आहे. समीर वानखेडेंना आता यापुढं झेड प्लस सुरक्षा असणार आहे. मागील काही दिवसांपासून समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबिय हे नवाब मलिक यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळं समीर वानखेडेंना सुरक्षा दिली असल्याचं बोललं जात आहे.

समीर वानखेडेंनी कथित कार्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला 25 कोटींची मागणी केली होती, असा दावा पंच असलेल्या प्रभाकर साईलने केले आहेत. तसेच मलिक यांनी समीर वानखेडेंनी जातीचा खोटा दाखला तयार करत दुसऱ्या व्यक्तीचा हक्क हिरावून नोकरी मिळवली आहे, असा आरोप मलिक यांनी समीर वानखेडेंवर केला आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या धर्म, शिक्षण आणि पहिल्या पत्नीसोबतच्या लग्नावरून मोठा वाद सध्या सुरू आहे. तसेच समीर वानखेडे यांचे वडिल हे हिंदू नसून मुस्लिम आहेत, असा दावा मलिक यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या –

“इतिहास काढला तर लक्षात येईल, हमाम में सब नंगे है”

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

“फडणवीस इथं येऊन गाजर वाटून गेले असतील”

कोरोना हा मोसमी आजार? वैज्ञानिकांच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

“फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याची अवस्था मला बघवत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More